'सर्जिकल'चा विचारही केला असता तर...- बसित

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

भारताने सर्जिकल स्ट्राईकचा विचार जरी केला असता, तरी आमच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सर्जिकलचा कोणताही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला नाही, कारण असे काही झालेच नाही.

नवी दिल्ली - भारतीय सैन्याने सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत सर्जिकल स्ट्राईक करण्याचा विचार केला असता तरी आमच्याकडून चोख प्रत्युत्तर दिले गेले असते, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दिली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना अब्दुल बसित यांनी भारताने केलेले सर्जिकल स्ट्राईक हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. उरी येथील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केले होते. यामध्ये 30 ते 40 दहशतवादी ठार झाले होते. पण, पाक उच्चायुक्तांनी असे काही झालेच नसल्याचे म्हटले आहे.

बसित म्हणाले, की भारतीय सैन्याकडूनच सीमेवर सतत गोळीबार करण्यात येतो. भारताने केलेला हे सर्जिकल स्ट्राईक नव्हते, तर शस्त्रसंधीचे उल्लंघन होते. भारत स्वतःच आपली पाठ थोपटून घेत आहे. भारताने सर्जिकल स्ट्राईकचा विचार जरी केला असता, तरी आमच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. सर्जिकलचा कोणताही व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला नाही, कारण असे काही झालेच नाही.

Web Title: Pak High Commissioner Abdul Basit rubbishes Indian surgical strike claims