'पाक की दीवानी' लिहीणाऱयांना बदड, बदड, बदडलं...

वृत्तसंस्था
सोमवार, 24 डिसेंबर 2018

शिमला: एका दुचाकीवरील नंबर प्लेटवर 'पाक की दीवानी' असे लिहीण्यात आले होते. गावकऱयांच्या ते लक्षात आले आणि ग्रामस्थांनी दोन युवकांना बदड, बदड, बदडलं व पोलिसांच्या ताब्यात दिले.

हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातील बरोटीवाला झाडमाजरी या गावात हा प्रकार घडला आहे. एका दुचाकीवरून दोन युवक झाडमाजरी गावात पोहोचले होते. युवकांकडे असलेल्या दुचाकीवर 'पाक की दीवानी' असे लिहिले होते. दुचाकीवरील नंबरप्लेट पाहून ग्रामस्थांचा राग अनावर झाले. ग्रामस्थांनी दोघांना लाथ-बुक्क्यांनी बदड, बदड, बदडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दोघांसह दुचाकी ताब्यात घेतली आहे.

दुचाकीस्वार हे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. परंतु, त्यांच्या दुचाकीवर 'पाक की दीवानी' असे का लिहिले आहे, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: pak ki divani number plate bike at shimla