काश्मीरमध्ये पाकच्या गोळीबारात 5 नागरिक ठार

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

पुँच जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमधील देवता धार गावावर आज सकाळी आठच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात मोहम्मद रमझान यांच्यासह पत्नी आणि तीन मुले ठार झाली आहेत.

जम्मू - पाकिस्तानी सैन्याकडून आज (रविवार) सकाळी पुँच जिल्ह्यातील सीमेवरील गावांवर करण्यात आलेल्या गोळीबारात 5 नागरिक ठार झाले आहेत. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुँच जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमधील देवता धार गावावर आज सकाळी आठच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबारात मोहम्मद रमझान यांच्यासह पत्नी आणि तीन मुले ठार झाली आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही.

गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास प्रत्युत्तर द्या असे सांगितले होते. तसेच त्यांनी म्हटले होते, की आपले सैन्य कोणत्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: Pak Shelling In Jammu And Kashmir Poonch 5 Civilians Killed