'सोशल मिडियाद्वारे पाककडून काश्‍मिरी तरुणांना चिथावणी'

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 मार्च 2017

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - जम्मू-काश्‍मिरमध्ये सुरक्षा पथकांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असताना स्थानिक तरुणांकडून होणाऱ्या दगडफेकीला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप जम्मू-काश्‍मिरच्या पोलिस महासंचालकांनी केला आहे.

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) - जम्मू-काश्‍मिरमध्ये सुरक्षा पथकांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू असताना स्थानिक तरुणांकडून होणाऱ्या दगडफेकीला पाकिस्तान जबाबदार असल्याचा आरोप जम्मू-काश्‍मिरच्या पोलिस महासंचालकांनी केला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना जम्मू-काश्‍मिरचे पोलिस महासंचालक एस. पी. वैद म्हणाले, "आपल्या देशाची आणि काश्‍मिरमधील शांतता भंग करण्यासाठी काही उपद्रवी लोक सोशल मिडियाचा गैरवापर करत आहेत. सुरक्षा पथकांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू झाल्यावर हे लोक सोशल मिडियाद्वारे तरुण मुलांना "चकमक स्थळी जा आणि दगडफेक करा', असे सांगत आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांना पळून जाण्यास मदत होते. असा संदेश पसरविणाऱ्या सोशल मिडियावरील (पाकिस्तानमधील) काही खात्यांची ओळख पटली आहे.' युवकांना आवाहन करताना वैद पुढे म्हणाले, "बंदूकीतून सुटणारी गोळी समोरून कोण येत आहे किंवा कोणाला लागणार आहे हे पाहत नाही. चकमक स्थळी असलेले सुरक्षा पथक मोटारी किंवा घरांचे संरक्षण घेतात. चकमकस्थळी येणारे तरुण आत्महत्या करत असतात. त्यामुळे चकमक सुरू असताना तरुणांनी घरात बसावे. चकमक सुरू असलेल्या ठिकाणी येऊ नये, असे मी त्यांना आवाहन करतो.'

"काश्‍मिरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी लष्कराकडून वेळोवेळी धोरणात बदल करण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे शक्‍य होते, असा लष्कराचा यापूर्वीचा अनुभव आहे', अशी माहितीही वैद यांनी यावेळी दिली.

 

Web Title: Pak using social media to instigate Kashmiri youth : DG Kashmir