पुँछमध्ये भारतीय चौक्यांवर पाकचा गोळीबार

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून 82 एमएम मॉर्टर्स आणि अत्याधुनिक बंदुकीतून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पुँछ जिल्ह्यातील एलओसीवरील कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुँछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) भारतीय चौक्यांवर आज (सोमवार) पहाटे पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या 24 तासांमध्ये तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. पुँछमध्ये अद्यापही काही भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात येत आहे. भारतीय जवानांकडूनही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल मनीष मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून 82 एमएम मॉर्टर्स आणि अत्याधुनिक बंदुकीतून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. पुँछ जिल्ह्यातील एलओसीवरील कृष्णा घाटी सेक्टरमधील भारतीय चौक्यांना लक्ष्य करण्यात आले. या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही.

Web Title: Pak violates ceasefire again, heavy firing in parts of Poonch