पाककडून पुन्हा विश्‍वासघात 

पीटीआय
सोमवार, 21 मे 2018

सीमेवरील गोळीबार थांबविण्याची विनंती करणाऱ्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा विश्‍वासघात केला. पाकिस्तानी रेंजर्सने आज जम्मूतील अर्णिया सेक्‍टरमध्ये केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात एक महिला आणि एका पोलिस अधिकाऱ्यासह सहा जण जखमी झाले.सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

जम्मू : सीमेवरील गोळीबार थांबविण्याची विनंती करणाऱ्या पाकिस्तानने आज पुन्हा एकदा विश्‍वासघात केला. पाकिस्तानी रेंजर्सने आज जम्मूतील अर्णिया सेक्‍टरमध्ये केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात एक महिला आणि एका पोलिस अधिकाऱ्यासह सहा जण जखमी झाले.सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

"बीएसएफ'च्या जवानांनी प्रतिहल्ला थांबवावा, अशी याचना कालच (ता. 20) पाकिस्तानी रेंजर्सने केली होती. मात्र, आज त्यांनी पुन्हा आंतरराष्ट्रीय सीमेवर तोफगोळ्यांचा मारा करत शस्त्रसंधी भंगाचा अजेंडा कायम ठेवला. पाकिस्तानच्या या माऱ्यामुळे आज आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमधील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे जवानांनी गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविले. 
 

Web Title: Pakistan attacks again