पाकिस्तानने चार अधिकाऱ्यांना परत बोलविले

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - पाकिस्तानने आज भारतातील उच्चायुक्तालयातील आपल्या चार अधिकाऱ्यांना परत मायदेशात बोलावून घेतले. हे चारही अधिकारी आज वाघा सीमेच्या मार्गाने पाकिस्तानात परत गेले. हेरगिरीप्रकरणी अटक केलेल्या मेहमूद अख्तर याच्या चौकशी दरम्यान या चार अधिकाऱ्यांची नावे पुढे आली होती.

नवी दिल्ली - पाकिस्तानने आज भारतातील उच्चायुक्तालयातील आपल्या चार अधिकाऱ्यांना परत मायदेशात बोलावून घेतले. हे चारही अधिकारी आज वाघा सीमेच्या मार्गाने पाकिस्तानात परत गेले. हेरगिरीप्रकरणी अटक केलेल्या मेहमूद अख्तर याच्या चौकशी दरम्यान या चार अधिकाऱ्यांची नावे पुढे आली होती.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील कर्मचारी मेहमूद अख्तर याने चौकशीदरम्यान या चौघांची नावे सांगितली होती. भारतात राहण्यास योग्य नाही असे जाहीर करीत भारताने मेहमूद अख्तरची हकालपट्टी केली होती. या हेरगिरी प्रकरणातील मेहमूद अख्तर हा एक भाग होता, असे या तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी मेहमूद अख्तर याचा हात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची दिल्ली पोलिसांनी कसून चौकशी केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात आणखी दहा जणांचा समावेश असल्याचा दावा मेहमूदने केला होता. मेहमूदच्या म्हणण्यानुसार अन्य दहा जण हे भारतीयांकडून माहिती मिळवीत होते. अख्तर हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसा विभागाच्या काउंटरवर काम करीत होता. सीमा सुरक्षा दलासंदर्भातील आणि भारत - पाकिस्तान सीमेवरील संवेदनशील माहिती अन्य दोन साथीदारांसह खरेदी करताना मेहमूदला अटक करण्यात आली होती. अख्तर आणि त्याचे साथीदार सुभाष जहागीर आणि मौलाना रमझान यांना गेल्या आठवड्यात दिल्लीतील प्राणिसंग्रहालयाच्या येथून अटक करण्यात आली होती. तीन तास चौकशी केल्यानंतर अख्तरला सोडून देण्यात आले होते. या प्रकरणातील चौथा आरोपी शोएब याला गेल्या आठवड्यात राजस्थान येथून अटक करण्यात आली होती. भारताच्या या कृतीला जशास तसे उत्तर म्हणून पाकिस्ताननेही तेथील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

Web Title: Pakistan called back four officers