पाकिस्तानने वाढवला भारतासाठी हवाई हद्द बंदीचा काळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मे 2019

'जैश-ए-महंम्मद' संघटनेच्या अड्डयावर 'एअर स्ट्राईक' केले होते. ज्यानंतर पाकिस्तानने भारतासाठी संपूर्ण पूर्व भागातील हवाई हद्द बंद केली होती.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करण्यासाठी भारतावरील बंदीची मुदत पाकिस्तानने वाढवली आहे. 14 जूनपर्यंत ही मुदत करण्यात आली आहे. 

पाकिस्तानी नागरी हवाई वाहतूक प्राधिकरणाच्या प्रवक्‍त्याने याबाबत माहिती पाकमधील माध्यमांना दिली. भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला बालाकोट येथील 'जैश-ए-महंम्मद' संघटनेच्या अड्डयावर 'एअर स्ट्राईक' केले होते. ज्यानंतर पाकिस्तानने भारतासाठी संपूर्ण पूर्व भागातील हवाई हद्द बंद केली होती.

मार्च महिन्यात ही बंदी पाकिस्तानने अंशतः कमी केली होती. मात्र भारतीय विमानांना या हवाई हद्दीच्या वापराबाबतची बंदी कायम ठेवण्यात आली होती. एप्रिलमध्ये पाकिस्तानने या हवाई हद्दीतील आणखी 11 हवाई मार्ग भारतातून पश्‍चिमेकडील देशांमध्ये जाणाऱ्या विमानांसाठी खुले केले. 

तेव्हापासून एअर इंडिया आणि तुर्किश एअरलाईन्सची विमानसेवा या हवाई मार्गावरून सुरू झाली होती. पण भारतात येणाऱ्या विदेशी विमान कंपन्यांना लांबच्या मार्गाने यावे लागत होते. युरोपियन किंवा दक्षिण पूर्वेकडील विमानांना हा लांबचा मार्ग तोट्याचा ठरत होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan extends airspace closure on Indian border till 14 June