पाकची 'बाबर 3' क्षेपणास्त्राची चाचणी बनावट!

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जानेवारी 2017

इस्लामाबाद : अण्वस्त्रवाहू क्षमता असलेल्या 'बाबर-3' या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचे काल (ता. 9) पाकिस्तानने अभिमानाने जाहीर केले असले तरी, हा पाकचा केवळ बनाव असल्याचा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. 

या क्षेपणास्त्र चाचणीचा व्हिडिओ पाकिस्तान सरकारने काल प्रसिद्ध केला होता. मात्र, हा व्हिडिओ म्हणजे संगणकाची करामत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी त्यांनी तांत्रिक पुरावाही दिला आहे. पेशावरमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'पाकिस्तानने समुद्राची पार्श्‍वभूमी दाखवून संगणकाच्या साह्याने क्षेपणास्त्र चाचणी निर्माण केली आणि 'बाबर-3'ची चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले. भारतातील तज्ज्ञांनीही पाकिस्तानचे पितळ उघडे पाडले आहे. 

'बाबर-3'च्या चाचणीच्या व्हिडिओमध्ये क्षेपणास्त्राचा रंग सुरवातीला पांढरा आणि नंतर नारंगी झाल्याचे दिसत आहे. पाकिस्तानने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओत उड्डाणादरम्यानच या क्षेपणास्त्राचा वेग प्रचंड वाढून ते अशक्‍य उंचीवर पोचल्याचे दाखविले आहे,' असे कर्नल विनायक भट (निवृत्त) यांनी एका इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे. 
 
Web Title: pakistan faked babur-3 nuclear submarine test

व्हिडीओ गॅलरी