पाकिस्तानी झेंडा सर्वोत्तम टॉयलेट पेपर

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

भारतीयांच्या या रोषाला आणखी एक जोड मिळाली आहे ती म्हणजे गुगलवर 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड' असे सर्च केल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा दाखविला जातो. 

पाकिस्तान चा झेंडा म्हणजे जगातील सर्वात चांगला टॉयलेट पेपर आहे, असे चक्क गुगल सांगत आहे! जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलच्या सर्च इमेजमध्ये 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड' असे सर्च केल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा दाखवते आहे.

पुलवामा येथे आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झालेत. त्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवत भारताने पाकिस्तान मधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातशूल्कात वाढ केली आहे व 'मोस्ट फेवरेट नेशन'चा दर्जाही काढला आहे. भारतीयांच्या या रोषाला आणखी एक जोड मिळाली आहे ती म्हणजे गुगलवर 'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड' असे सर्च केल्यानंतर पाकिस्तानचा झेंडा दाखविला जातो. 

काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात भारतीय जवानांच्या बसवर 14 फेब्रुवारीला आत्मघाती बॉम्ब हल्ला झाला होता. ज्यात 42 जवान हुतात्मा तर काही जवान गंभीर जखमी झाले होते. आदिल दार या आत्मघाती हल्लेखोराने हा हल्ला घडवून आणला होता. जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. 

 

pakistan flag

ट्विटरवासियांमध्ये #Besttoiletpaperintheworld हा हॅशटॅग व्हायरल होत आहे.
 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Flag is a Best Toilet Paper in the world in google search