masood azhar
masood azhar

मसूद अझहर आमच्याकडेचः पाक मंत्री

नवी दिल्लीः जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर हा पाकिस्तानमध्येच आहे, अशी कबुली परराष्ट्रमंत्री महमूद कुरेशी यांनी दिली.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना कुरेशी म्हणाले, 'मला मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर हा पाकिस्तानमध्येच आहे. पण, सध्या तो आजारी असल्याने त्याला घराबाहेर पडणेही शक्य नाही. दहशतवादी कारवायांमध्ये जर त्याचा सहभाग असल्याचे पुरावे भारताने सादर केले तर पाकिस्तानी न्यायालय व नागरिकांचा त्यावर विश्वास बसेल. मसूद विरोधात ठोस पुरावे असतील तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल.'

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात 'सीआरपीएफ'चे 40 जवान हुतात्मा झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली आहे. भारताने या हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला दिले आहेत. शिवाय, भारताने वारंवार मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले जावे यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र, चीन नेहमीच अडथळा आणत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com