भारतीय मच्छीमारांची पाककडून मुक्तता 

पीटीआय
रविवार, 1 जुलै 2018

पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या दोन गुजराती मच्छीमारांची मुक्तता करण्यात आली असून, ते लवकरच भारतात दाखल होणार असल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली. मुक्तता करण्यात आलेले दोघेही गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त आहेत. 

वडोदरा - पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या दोन गुजराती मच्छीमारांची मुक्तता करण्यात आली असून, ते लवकरच भारतात दाखल होणार असल्याची माहिती आज अधिकाऱ्यांनी दिली. मुक्तता करण्यात आलेले दोघेही गंभीर स्वरूपाच्या आजाराने ग्रस्त आहेत. 

गुजरातमधील गीर सोमनाथ जिल्ह्यातील पाल्डी येथील धनाभाई चौहान आणि सौराष्ट्रातील कांझोतार येथील रामाभाई गोहील अशी पाकिस्तानकडून मुक्त करण्यात आलेल्या मच्छीमारांची नावे आहेत. या दोन्ही भारतीय नागरिकांची पाकिस्तानमधील तुरुंगातून शनिवारी संध्याकाळी मुक्तता करण्यात आली आहे. वाघा सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून या दोघांना सीमा सुरक्षा दलाकडे (बीएसएफ) सोपविण्यात आले. त्यानंतर अमृतसर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केले होते, अशी माहिती गुजरात राज्य मासेमारी विभागाचे अधिकारी किरण दवे यांनी दिली

Web Title: Pakistan to free Indian fishermen