जमात उद दवा निवडणुकीत 200 उमेदवार उभे करणार 

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मास्टरमाइंड हाफिज सईदची संघटना जमात उद दवा पाकिस्तानात 25 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 200 हून अधिक उमेदवार उभे करणार आहे. मात्र, या निवडणुकीत हाफिज सईद उभा राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

लाहोर - मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मास्टरमाइंड हाफिज सईदची संघटना जमात उद दवा पाकिस्तानात 25 जुलै रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 200 हून अधिक उमेदवार उभे करणार आहे. मात्र, या निवडणुकीत हाफिज सईद उभा राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

दहशतवादी संघटना जमात उद दवाने आपला राजकीय पक्ष मिल्ली मुस्लिम लीग (एमएमएल)ची स्थापना केली आहे. मात्र, पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने या पक्षाची अद्याप नोंदणी केलेली नाही. त्यामुळे या गटाने फारसा सक्रिय नसलेला राजकीय पक्ष अल्ला हो अकबर तेहरिक (एएटी) पक्षाच्या नावाने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाला आयोगाची मान्यता आहे. जमात उद दवाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी निवडणूक आयोगाकडून उमेदवारी अर्ज घेतले आहेत. हे अर्ज एएटी पक्षाकडून दाखल करण्यात येणार आहे. एमएमएलचे अध्यक्ष सैफुला खालिद आणि एएटीचे प्रमुख अहमद बरी यांनी संयुक्तपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एमएमएल दोनशेहून अधिक उमेदवार एएटीचे निवडणूक चिन्ह खुर्चीच्या बॅनरखाली निवडणूक लढणार आहेत.

Web Title: Pakistan general elections: Hafiz Saeed not to contest, JuD to run for over 200 seats