कराचीत उष्माघाताने 65 जणांचा मृत्यू 

पीटीआय
बुधवार, 23 मे 2018

पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीत सध्या उष्णतेची लाट असून, गेल्या तीन दिवसांत 65 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तापमानात वाढ होत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराचीत सध्या उष्णतेची लाट असून, गेल्या तीन दिवसांत 65 जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तापमानात वाढ होत असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कराचीमध्ये सोमवारी (ता. 21) 44 अंश सेल्सिअस तापमान होते. सध्या रमजानचे उपवास सुरू असल्याने नागरिक दिवसा काही खात किंवा पित नाहीत. त्यातच वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. कराचीत गेल्या तीन दिवसांत उष्माघाताचे 65 बळी गेले आहेत. यातील बहुतेक जण लांधी आणि कोरांगी येथील रहिवासी असून अनेक जणांचे निधन घरातच झाल्याचे इधी फाउंडेशनचे चालक फैसल इधी यांनी सांगितले. बळी पडलेल्यांमध्ये सहापासून 78 वर्षांच्या व्यक्तींचा समावेश आहे. 
 

Web Title: Pakistan heatwave kills 65 people in Karachi