ईदच्या दिवशीही भारतीय लष्करावर तुफान दगडफेक  

वृत्तसंस्था
शनिवार, 16 जून 2018

ईदच्या दिवशीसुद्धा कश्मीर शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकीस्तानचे पुरेपुर प्रयत्न चालू असल्याचे त्यांच्या हरकतीवरुन दिसत आहे. एकीकडे पाकीस्तानकडून अरनिया सेक्टरमध्ये आज गोळीबार केला गेला. तर, अनंतनाग सेक्टरमध्ये सुरक्षादलावरती हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर, पुलवामा सेक्टरमध्ये जमावाने हल्ला करुन दगडफेक केली. 

जम्मू कश्मीर - ईदच्या दिवशीसुद्धा कश्मीर शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. कश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकीस्तानचे पुरेपुर प्रयत्न चालू असल्याचे त्यांच्या हरकतीवरुन दिसत आहे. एकीकडे पाकीस्तानकडून अरनिया सेक्टरमध्ये आज गोळीबार केला गेला. तर, अनंतनाग सेक्टरमध्ये सुरक्षादलावरती हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर, पुलवामा सेक्टरमध्ये जमावाने हल्ला करुन दगडफेक केली. 

या प्रत्युत्तरात, जमावाला रोखण्यासाठी जवानांना अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर जखमी आहे. यावेळी जमावाने पाकीस्तानी झेंडा फडकावल्याचे दिसून आले. तर, स्वातंत्र्याच्या घोषणाही देण्यात आल्या. 

दरम्यान, आज सकाळी पाकीस्तानकडून झालेल्या गोळीबारात भारतीय जवान बिकास गुरुंग हे शहीद झाले. यापूर्वीही सीआरपीएफच्या बसवर दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी (ता.14) घडली होती. 

Web Title: pakistan id kashmir firing stonebathing security forces jawans namaz