पाकच्या 'सेजल'ने केले अधिकाऱयांचे संगणक हॅक

pakistan isi spy sejal kapoor hack indian official computer
pakistan isi spy sejal kapoor hack indian official computer

नवी दिल्लीः सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवर 'सेजल कपूर' या नावाने प्रोफाईल असून हेरगिरीचे काम करत आहे. भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दलातील अनेक अधिकाऱयांच्या संगणकामध्ये घुसखोरी करून हॅक केले आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

पाकिस्तानी हेराने संरक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या 98 पेक्षा जास्त भारतीय अधिकाऱ्यांच्या संगणकामध्ये घुसखोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. 2015 ते 2018 या कालावधीत पाकिस्तानी हेराने भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दल तसेच राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील पोलीस अधिकाऱ्यांचे संगणक हॅक केले होते. पश्चिम आशियाई देशातील एका सॉफ्टवेअरच्या मदतीने 'सेजल कपूर'ने आपले व्हिडिओ आणि छायाचित्र दाखवून संबंधितांना आपल्या जाळयात ओढले होते. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची गोपनीय माहिती लीक करण्याच्या प्रकरणातही तिचा सहभाग होता. ब्राह्मोस हे भारताचे सर्वांत अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे.

भारतीय संगणकांमध्ये घुसखोरी करण्यासाठी तिने 'व्हिस्पर' या मॅलवेअरचा वापर केला. संगणकामधील माहिती मिळवण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरचा उपयोग केला होता. आयएसआयला ब्राह्मोस क्षेपणास्त्राची गोपनीय माहिती दिल्या प्रकरणी गेल्या वर्षी लष्करी गुप्तचर आणि उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पाचा अभियंता निशांत अग्रवालला अटक केली होती. त्यावेळी केलेल्या तपासानंतर 'सेजल कपूर'चा खुलासा झाला होता. सेजलने तिच्या फेसबुक अकाऊंटवर इंग्लंड मँचेस्टरमधल्या ग्रोथ कंपनीची कर्मचारी असल्याचे म्हटले होते. संगणकातून माहिती मिळवण्यासाठी ती विविध संस्थांच्या अधिकाऱ्यांना संगणकात व्हिस्पर सॉफ्टवेअर इनस्टॉल करण्यासाठी जबरदस्ती करत होती, अशी माहिती तिच्या चॅटवरुन पुढे आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com