अभिनंदन यांना छळणारा पाकिस्तानी सैनिक ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान नियंत्रण रेषेवरील चकमकीत ठार झाला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. लष्कराने त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात अहमद खान ठार झाला.

नवी दिल्ली - हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा छळ करणारा पाकिस्तानी सैनिक अहमद खान नियंत्रण रेषेवरील चकमकीत ठार झाला आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला. लष्कराने त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात अहमद खान ठार झाला.

पुलवामा हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून भारताने बालाकोटवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी विमानांनी घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्या वेळी विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे "एफ-16' विमान पाडले; पण ते पाकिस्तानच्या ताब्यात सापडले होते. त्या वेळी पाकिस्तानी लष्कराच्या "स्पेशल सर्व्हिस ग्रुप'मधील सुभेदार अहमद खानने विंग कमांडर अभिनंदन यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा छळ केला होता.

नकीयाल सेक्‍टरमध्ये 17 ऑगस्टला झालेल्या चकमकीत अहमद खान ठार झाल्याचे उघडकीस आले आहे. 27 फेब्रुवारीला विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्यानंतर पाकिस्तानकडून जो फोटो प्रसिद्ध करण्यात आला, त्या फोटोत दाढीवाला सैनिक हा अहमद खान आहे. "जैशे महंमद'च्या दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचे आणि साथीदारांना काश्‍मीरमध्ये दहशतवादासाठी अहमद खान मदत करीत होता, असे सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Jawan Death in firing