पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ; आमदार फिरोज सेठविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

"काँग्रेस उमेदवार फिरोज सेठ यांच्या न्यू गांधीनगर येथील प्रचार दौऱ्यात पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिल्याचे आढळून आहे. या विरोधामध्ये माळमारुती पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार फिरोज सेठ आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.'' 

- अॅड. प्रवीण करोशी, तक्रारदार

बेळगाव : न्यू गांधीनगर येथील प्रचार दौऱ्यात पाकिस्तान जिंदाबाद असा नारा दिल्याबद्दल आमदार फिरोज सेठसह समर्थकांवर आज (ता.9) गुन्हा दाखल झाला आहे. आमदार फिरोज सेठ यांची 6 मे रोजी न्यू गांधीनगरला सभा होती. सभा उरकून फिरोज सेठ आणि त्यांचे समर्थक निघून जात असताना समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यामुळे उपस्थित कार्यकर्ते व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा समर्थकांनी केला आहे. 

राष्ट्रीय एकात्मतेला तडा पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी याविरोधामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार सेठ आणि उपस्थित समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. अॅड. प्रवीण करोशी यांनी याबाबत माळमारुती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी 6 मे रोजी फिरोज सेठ यांची सभा न्यू गांधीनगरला होती.

सभेनंतर सेठ आणि समर्थक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चालत जात होते. त्यावेळी सेठ यांच्या पाठीमागून येणाऱ्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला. यामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करत देशाच्या अखंडतेला तडा पोचविण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. त्यानुसार सेठसह अन्यच्या विरोधात भादवि 153 (अ), 122 (अ), 109 आणि 123 लोकप्रतिनिधी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: pakistan jindabad announcements FIR Registered against MLA Firoz Saith