पाकला माहित आहे भारताची ताकद- नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानला भारतीय लष्कराची ताकद माहित झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) म्हटले आहे.

भटिंडा (पंजाब) येथे एम्सच्या उद्घाटनावेळी मोदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, पाकिस्तानला भारतीय लष्कराची ताकद चांगलीच माहित आहे. सिंधू पाणी करारात भारताच्या हक्काचे पाणी पाकिस्तानात वाहून जात आह. यापुढे प्रत्येक थेंब पाणी थांबवून पंजाब, जम्मू काश्मीरमधील शेतक-यांसाठी आणणार आहे. भारताच्या हक्काचं पाणी पाकिस्तानला जाणार नाही.'

'भारतातील पाणी आपल्या शेतकऱयांना पुरेपुर मिळालेच पाहिजे. माझ्या शेतकऱयांना पाणी मिळालेच पाहिजे. पाकिस्तानला पाणी दिले जाणार नाही', असेही मोदी म्हणाले.

दरम्यान, 'पाकिस्तानने भारतावर सर्जिकल स्ट्राईक केला, तर भारताला ही घटना त्यांच्या मुलांना अभ्यासक्रमातून शिकवावी लागेल. भारताकडून सातत्याने शस्त्रसंधी भंग होत असताना पाकिस्तानने आतापर्यंत संयम बाळगला आहे. मात्र, सामान्य नागरिकांवर हल्ला झाल्यास तो सहन करणार नाही,' असे वक्तव्य पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी गुरुवारी (ता. 24) केले होते.

Web Title: Pakistan knows what Indian Army is capable of, PM