पाकिस्तानला आता मोठाच डोस द्या : सेहवाग

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

दोन भारतीय जवनांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याचे ऐकून तीव्र दु:ख होत आहे. जवानांचे हौतात्म्य वाया जाता कामा नये. जर पाकिस्तानला लहान डोसने गुण येत नसेल, तर त्यांना मोठा डोस देण्याची गरज आहे.

नवी दिल्ली - पाकिस्तानने दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्याच्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनेही पाकिस्तानला आता मोठा डोस देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. 

वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की दोन भारतीय जवनांच्या मृतदेहाची विटंबना झाल्याचे ऐकून तीव्र दु:ख होत आहे. जवानांचे हौतात्म्य वाया जाता कामा नये. जर पाकिस्तानला लहान डोसने गुण येत नसेल, तर त्यांना मोठा डोस देण्याची गरज आहे.

पाकिस्तानी सैन्याने सोमवारी पहाटे कृष्णा घाटी परिसरात छुप्या पद्धतीने हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले. शहीद झालेल्या दोन भारतीय जवानांचा पाकिस्तानी रेंजर्सनी शिरच्छेद केल्याचीही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर देशभरातून संपप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नायब सुभेदार परमजीत सिंह आणि हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर अशी शहीद झालेल्या भारतीय जवानांनी नावे आहेत.

Web Title: Pakistan Need a bigger dose,if small doesn't work says Virender Sehwag‏