पाकड्यांनो हा घ्या पुरावा; इम्रान खानचा 'हा' मंत्री दहशतवाद्यांच्या संपर्कात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

इम्रान खान यांचे सरकार हाफिज सईद सोबत काहीही वाईट होऊ देणार नाही, असे स्पष्टपणे या व्हिडीओत आफ्रिदी यांनी म्हटले आहे. 

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे जाहीर केले असले तरी त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री शहरयार आफ्रिदी यांचा एक व्हिडीओ समोर आला असून, ते दहशतवाद्यांशी बोलतानाचा हा व्हिडीओ आहे. 

या व्हिडीओत आफ्रिदी म्हणत आहेत की, 'जोपर्यंत मी संसदेत आहोत, तेहरिक-ए-इन्साफ आहे, तोपर्यंत हाफिज सईद साहेब तर सोडाच पण जे पाकिस्तानची सोबत देतील त्यांना आम्ही सोबत देऊ. हा आमचा विश्वास आहे.' इम्रान खान यांचे सरकार हाफिज सईद सोबत काहीही वाईट होऊ देणार नाही, असे स्पष्टपणे या व्हिडीओत आफ्रिदी यांनी म्हटले आहे. 

पाकिस्तान आणि दहशतवाद यांचा काहीही संबंध नाही, असे ठामपणे नेहमीच ओरडणाऱ्या इम्रान खान यांना हा व्हिडीओ म्हणजे चपराक ठरला आहे. इम्रान खान यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दहशतवाद्यांशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी भारताने हल्ला केला तर प्रत्युत्तर देऊ असेही म्हटले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan Prime Minister Imran Khans party leader supports terrorism