पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात 6 नागरिक जखमी

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 ऑक्टोबर 2016

पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरील आर. एस. पुरा आणि अर्निया सेक्टरमधील भारतीय चौक्या व गावांवर गोळीबार केला. पाक सैन्याकडून मोर्टारही टाकण्यात आले.

जम्मू - पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बुधवारी रात्री आंतरराष्ट्रीय सीमेवर करण्यात आलेल्या गोळीबारात सीमेवरील गावांतील सहा नागरिक जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवरील आर. एस. पुरा आणि अर्निया सेक्टरमधील भारतीय चौक्या व गावांवर गोळीबार केला. पाक सैन्याकडून मोर्टारही टाकण्यात आले. आर. एस. पुरा सेक्टरमधील एका गावातील घरावर हे पडल्याने सहा नागरिक जखमी झाले. आज (गुरुवार) पहाटे सहापर्यंत पाक सैन्याकडून गोळीबार सुरु होता. भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले.

आर. एस. पुरा सेक्‍टरमध्ये मंगळवारी पाकच्या गोळीबारात एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता, तर एक जवान हुतात्मा झाला होता. भारताने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तान खवळला असून, त्यांच्या लष्कराने आतापर्यंत 40 हुन अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

Web Title: Pakistan resorts to ceasefire violation in Jammu's RS Pura, six civilians injured