पाकिस्तान घाबरला; रात्रीचे दिवे बंद, सीमेवर रणगाडे...

Pakistan tanks moving towards sialkot border for counter attack if India attack
Pakistan tanks moving towards sialkot border for counter attack if India attack

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने आक्रमकतेचे धोरण स्वीकारल्याने पाकिस्तान घाबरले असून, सीमेवर रणगाडे रवाना केले आहेत.

इस्राईल, अमेरिका, रशियासारख्या देशांनीही भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून, भारताने निर्णायक कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पाकिस्ताननेही युद्धाची तयारी सुरू केली आहे. भारताने जर युद्धाचा मार्ग पत्करलाच तर पाकिस्तानही भारताला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानने भीतीपोटीच सीमेवर रणगाडे रवाना केले असून, सियालकोट सीमेजवळ मोठ्या प्रमाणात रणगाडे तैनात केले आहेत. सीमेजवळील गावे खाली केली असून, अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. नियंत्रण रेषेजवळील नागरिकांची ये-जा थांबवली आहे. रात्रीच्या वेळी गरज नसल्यास विजेचे दिवे लावू नका, असे निर्देश पाकिस्तान सरकारने नागरिकांना दिले आहेत.

पाकिस्तानने सर्व लष्करी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारकडून लष्कराला कारवाईचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. पाकिस्तानी लष्कराने जिलानी रुग्णालयाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे. लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले असून, सामान्य रुग्णालयांमध्ये जवानांसाठी 25 टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

युद्धाच्या परिस्थितीत क्वेट्टा लॉजिस्टिक परिसरात सिंध आणि पंजाबमधील सामान्य आणि लष्करी रुग्णालयात जखमी सैनिकांना दाखल केले जाऊ शकते. प्राथमिक उपचारानंतर या सैनिकांना बलुचिस्तान येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्याची योजना आहे, असे HQLA चे फोर्स कमांडर एशिया नाज यांनी जिलानी रुग्णालयाच्या अब्दुल मलिक यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com