पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पाकिस्तानकडून आज (शनिवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये तोफगोळ्यांसह छोट्या बंदुकांचा मारा केला. 

जम्मू : पाकिस्तानकडून आज (शनिवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये तोफगोळ्यांसह छोट्या बंदुकांचा मारा केला. यामध्ये लान्सनायक संदीप थापा (वय 35) हे हुतात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये थापा हे गंभीर जखमी झाले होते, यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिली. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. थापा हे डेहराडून येथील रहिवासी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan violated ceasefire One Soldier Martyr