पूंच येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन

वृत्तसंस्था
बुधवार, 28 मार्च 2018

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय तळांवर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेला हा गोळीबार पूंच जिल्ह्यातील खारी करमारा भागातील सीमा रेषेवर करण्यात आला.

जम्मू : दहा दिवसांच्या शांततेनंतर पाकिस्तानकडून काल (मंगळवार) सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी सैन्य या दोन्ही भागांकडून गोळीबार करण्यात आला. 

ceasefire army

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की पाकिस्तानी सैन्याकडून भारतीय तळांवर गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेला हा गोळीबार पूंच जिल्ह्यातील खारी करमारा भागातील सीमा रेषेवर करण्यात आला. पाकिस्तानी सैन्याकडून काल रात्री उशीरा साडेआठच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. हा गोळीबार साधारणपणे अर्धा तास सुरु होता. आपल्या सैन्याने त्यांना अत्यंत प्रभावी आणि चोख प्रत्युत्तर दिले. या परिसरात गेल्या दहा दिवसांपासून शांतता होती. मात्र, या शांततेनंतर काल गोळीबार करण्यात आला. 

ceasefire army

दरम्यान, पाकिस्तानने 18 मार्च रोजी केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले होते. हा हल्ला सीमा रेषेवरील पूंच जिल्ह्यातील बालाकोट सेक्टरमध्ये घडली. 

Web Title: Pakistan violates ceasefire along LoC in Jammu and Kashmirs Poonch District