पाकिस्तानकडून दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन

वृत्तसंस्था
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पाक सैन्याकडून केलेल्या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही. पाककडून दोनवेळा गोळीबार करण्यात आला.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील भारतीय चौक्यांवर आज (सोमवार) सकाळी नऊच्या सुमारास पाक सैन्याकडून गोळीबार करण्यात आला. पाक सैन्याकडून मॉर्टर बॉम्बचाही वापर करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही चोख प्रत्युत्तर दिले.

पाक सैन्याकडून केलेल्या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही. पाककडून दोनवेळा गोळीबार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेवर सांबा सेक्टरमध्ये 2 फेब्रुवारीला दहशतवाद्यांचा घुसखोरीचा कट उधळून लावला होता.

Web Title: Pakistan violates ceasefire twice in Samba sector