'तेव्हा काश्‍मीर गिळण्याचा पाकिस्तानचा होता इरादा'

पीटीआय
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : चीनविरोधात 1962 मध्ये झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने 1965 च्या एप्रिल- मे महिन्यामध्ये भारताच्या कच्छ प्रांतात घुसखोरी केली होती. या वेळी लष्करी बळाचा वापर करून काश्‍मीर घेण्याचा पाकचा इरादा होता, तसेच भारतासोबतचे सर्वच राजकीय वाद लष्करी बळाचा वापर करून सोडवावेत, अशी पाकिस्तानची धारणा झाली होती, असे धक्कादायक खुलासे लेफ्टनंट जनरल एन. एस. ब्रार (निवृत्त) यांनी त्यांच्या ताज्या "ड्रमर्स कॉल' या पुस्तकामध्ये केले आहेत. "दि ब्राऊजर' या प्रकाशन संस्थेकडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. 

चीनविरोधातील युद्धात भारताचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने कच्छमध्ये घुसखोरी केली होती. यानंतर भारतानेही तीन सदस्यीय आंतरराष्ट्रीय लवादाच्या माध्यमातून कच्छच्या सीमावर्ती भागाची आखणी करण्याची तयारी दर्शविली होती. भारताच्या या पराभवामुळे पाकिस्तानच्या अंगात आणखीनच बळ आले होते. बळाचा वापर करून काश्‍मीर घेता येऊ शकतो, अशी त्यांची भावना बनली होती, असा दावा ब्रार यांनी केला आहे. 

मनोधैर्यावर परिणाम 

कच्छवरून निर्माण झालेल्या संघर्षाचे पडसाद पुढे 1965 मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तान युद्धात उमटले. चीनविरोधात 62 मध्ये झालेल्या युद्धात पराभव झाल्यानंतर भारताचे मनोधैर्य खचले होते. त्या वेळी गुणवत्ता आणि शस्त्रबळ अशा दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानचे लष्कर सरस होते, त्यामुळे भारतासोबतचे राजकीय प्रश्‍न लष्करी बळाचा वापर करून सोडविले जावेत, अशी पाकिस्तानची धारणा बनली होती, असेही ब्रार यांनी या ग्रंथात नमूद केले आहे.

Web Title: Pakistan was keen to Captured Kashmir