पाकविरुद्ध 'हम एक है'- कुमार विश्वास

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली- पाकिस्तानला उघडे पाडण्याच्या कोणत्याही कामात आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत. सर्जिकल स्ट्राइकवर प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे. भारतीय जवानांनी सीमेवर जो पराक्रम केला त्याला आम आदमी पक्ष आणि देशातील प्रत्येक नागरिक सलाम करत आहे, शुभेच्छा देत आहे, अशी प्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी व्यक्त केली.

अंतर्गत मतभेद असले तरी देशाचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा, जगातील कोणत्याही व्यासपीठावर पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आम्ही सदभावनांसह, शुभेच्छांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहू. संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या वतीने प्रतिनिधी म्हणून अटलबिहारी वाजपेयी विरोधी पक्षात असतानाही त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. तसेच, आता पाकिस्तानला त्यांची लायकी दाखविण्याची वेळ आली आहे. भारतीय जवानांच्या साहसाबद्दल त्यांना प्रणाम करतो. आम्ही कायम ठामपणे देशासाठी सोबत आहोत, असे विश्वास यांनी सांगितले. 

Web Title: Pakistan: "We believe in our Unity : Kumar