तालिबानमध्ये पाकिस्तानचा हवाई हल्ला, ४७ ठार

मृतांत महिलांचा समावेश; २२ जण जखमी, पाकच्या राजदूतास पाचारण केले
Air Strike Afghanistan
Air Strike Afghanistane sakal

काबुल : पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार भागात पाकिस्तान सैनिकांनी मोठी कारवाई करत हवाई हल्ले केले. या हल्ल्यात अफगाणिस्तानातील ४७ जण ठार झाले. यात महिला आणि मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यात २२ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्यासंदर्भात निवेदन जारी केले. यात म्हटले की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर गेल्या काही दिवसांत कारवाया वाढल्या आहेत. या कुरापतीतून पाकिस्तानच्या सैनिकांना लक्ष्य केले जात आहे. टीटीपी (तेहरिक ए तालिबान पाकिस्तान)सह अन्य दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानच्या सुरक्षा चौकीवर हल्ले केले आहेत.

या हल्ल्यात पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. त्यामुळे हवाई हल्ले करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानने तालिबानच्या अधिकाऱ्यांना दहशतवाद्याविरोधात कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. या हल्ल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानच्या सरकारने काबुलमध्ये पाकिस्तानच्या राजदूताला पाचारण केले आणि जाब विचारला. यावेळी पाकिस्तानने म्हटले की, दहशतवाद्यांना टार्गेट करण्यासाठीच हल्ले करण्यात आले आहेत. परंतु तालिबानने हा दावा फेटाळून लावला आहे.

अफगाण-पाकमधील वैर

तेहरिक ए तालिबान ही एक पश्‍तून इस्लामी दहशतवादी संघटना आहे.तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटले की, पाकिस्तानचे हवाई हल्ले हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील वैर आणखी वाढवणारे आहे. पाकिस्तानला ठाऊक असायला हवे की, जर युद्ध सुरू झाले तर ते कोणासाठीच हिताचे नसेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com