पाकिस्तानी नागरिकांना सांबामध्ये अटक

वृत्तसंस्था
रविवार, 17 जून 2018

जम्मू-काश्‍मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या दोन जवानांना अटक केली. सीमा सुरक्षा दलाचे जवान रात्री आंतरराष्ट्रीय सीमेवर गस्त घालत असताना सांबा भागातील चाक फकीरा भागात दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

जम्मू : जम्मू-काश्‍मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या दोन जवानांना अटक केली. सीमा सुरक्षा दलाचे जवान रात्री आंतरराष्ट्रीय सीमेवर गस्त घालत असताना सांबा भागातील चाक फकीरा भागात दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या नागरिकांची ओळख पटली असून, सोहल (वय 31) आणि त्यांचा मुलगा महंमद शरीफ अशी त्यांची नावे आहेत. ते सर्वजण पाकिस्तानच्या नरवाल जिल्ह्यातील चामना कलन येथील रहिवासी आहेत. त्याचप्रमाणे अहमद आणि त्यांचा मुलगा अल्लाह हे दोघेही पाकिस्तानच्या नरवाल जिल्ह्यातील छामना कालन या भागातील आहेत. ते दोघेही मजूर असून, त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Pakistani citizens arrested in Samba