भारताला मिळाला आणखी एक पाकिस्तानी जावई

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 August 2019

हसन याने मूळची हरियाणाची रहिवाशी असणा-या शामिया आरजू हिच्यासोबत दुबई येथे लग्न केले असून सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

दुबई : एकीकडे काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हितसंबधात तणाव निर्माण झाला आहे. मात्र, दुसरीकडेच एक नवी सोयरीक देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यात जुळून आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली हा मंगळवारी (ता.21) भारतीय वंशाच्या शामिया आरजू हिच्यासोबत लग्नाच्या बेडीत अडकला.

हा लग्नसोहळा दुबईतील अटलांटिस पाम जुमेरा पार्क या हॅाटेल मध्ये पार पडला. सध्या सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटोज व्हायरल होत आहेत. 
शामिया ही हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील चंदेनी गावची रहिवाशी असून ती एमिराईट्स या विमान कंपनीत वैमानिक अभियंता म्हणून काम पाहते. तसेच तीचे बरेच नातेवाईक पाकिस्तानात वास्तव्यास असून त्यांनीच हे लग्न ठरविल्याचे समजते. 

लग्नानंतरही केले विकेट सेलिब्रेशन
हसन अली हा प्रत्येक विकेट घेतल्यानंतर एक अनोख्या प्रकारचे सेलिब्रेशन करतो त्याने आपली लग्नानंतरही तशाच प्रकारचे सेलिब्रेशन केले हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. तसेच लग्न होण्याआधीच्या रात्री देखील हसन याने एक फोटो शेअर केला होता. ज्यात त्याने अविवाहित म्हणून शेवटची रात्र असे देखील फोटो खाली लिहीले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistani cricketer hasan ali marries to indian girl shamiya aarjo