मिराजचा आकार पाहून पळाली पाकिस्तानची विमाने

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

पाकिस्तानमध्ये गेलेली मिराज ही लढाऊ विमाने काही मिनिटांमध्ये हल्ला करून पुन्हा यशस्वी भारतात परतली. भारताकडून हल्ला होत असताना पाकिस्तानची एफ 16 ही लढाऊ विमाने प्रत्युत्तर देण्यासाठी आली होती. पण, मिराज विमानांचा आकार आणि हल्ल्याची तीव्रता पाहून ती पुन्हा परतली. त्यामुळे भारताचा हा हल्ला किती तीव्र होता हे यातून दिसते.

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या हद्दीत कारवाईसाठी गेलेल्या भारतीय हवाई दलाच्या मिराज या विमानांचा आकार आणि त्यांच्याकडून होत असलेला हल्ला पाहून पाकिस्तानची लढाऊ विमाने पळून गेल्याचे वृत्त समोर येत आहे.

भारताचे लढाऊ विमान असलेल्या मिराज या 12 विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकले. बालाकोट, मुझफ्फराबाद येथे हल्ला करत जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्कराच्या प्रवक्त्याने दिल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईची माहिती सर्वांसमोर आली. भारतीय हवाई दलाच्या मिराज या लढाऊ विमानांनी केलेल्या या कारवाईबद्दल मिराज विमानांची चर्चा होत आहे.

पाकिस्तानमध्ये गेलेली मिराज ही लढाऊ विमाने काही मिनिटांमध्ये हल्ला करून पुन्हा यशस्वी भारतात परतली. भारताकडून हल्ला होत असताना पाकिस्तानची एफ 16 ही लढाऊ विमाने प्रत्युत्तर देण्यासाठी आली होती. पण, मिराज विमानांचा आकार आणि हल्ल्याची तीव्रता पाहून ती पुन्हा परतली. त्यामुळे भारताचा हा हल्ला किती तीव्र होता हे यातून दिसते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistani F16s were scrambled to retaliate against IAF Mirage 2000s but turned back due to size of Indian formation