गुजरातच्या सीमेवर पाकिस्तानचे ‘ड्रोन’ नष्ट

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

भुज (गुजरात) भारजाने आज पहाटे एअरस्ट्राईक केल्यानंतर आता मोठी बातमी आली आहे. गुजरातमध्ये कच्छच्या सीमेवर भारताने पाकिस्तानचे एक ड्रोन नष्ट केल्याची माहिती आहे.

कच्छच्या सीमेवर आज (दि.26) सकाळी साडेसहाच्या सुमारास हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर त्याला तातडीने नष्ट करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. ‘इंडियाटुडे’ या इंग्रजी वृत्तपत्राने याची प्रथमिक माहिती दिली आहे. 

'येत्या काळात भारतामध्ये आणखी दहशतवादी हल्ले करण्याचा कट 'जैश ए महंमद'ने रचला होता. त्यामुळे देशाचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई गरजेची होती', असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आज (मंगळवार) स्पष्ट केले. त्या पार्श्वभूमिवर हा ड्रोन निकामी केल्याची माहिती महत्त्वपूर्ण असल्याचे समजते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan's 'drone' destroyed on Gujarat border