छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हाती पाकिस्तानची शस्त्रे 

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हाती पाकिस्तानची शस्त्रे 

रांची : छत्तीसगडमधील नक्षलवादी कारवायांसाठी परदेशातून शस्त्रपुरवठा होत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. मध्यंतरी कांकेर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांच्या ताब्यातून जर्मन बनावटीची "हेकलर आणि कोच जी-3' रायफल जप्त केली होती. या अत्याधुनिक बंदुकांचा वापर अमेरिका, पाकिस्तानी लष्कर आणि "नाटो'च्या सैन्याकडून केला जातो, अशी माहिती सुरक्षा दलांनी दिली. यामुळे देशातील अस्थिरतेमागे पाकिस्तानचाच हात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

पाकिस्तानी लष्कर वापरत असलेली अमेरिकी बनावटीची "जी-3' ही रायफल आम्ही नक्षलवाद्यांच्या ताब्यातून जप्त केली असल्याचे पोलिस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी सांगितले. ही अत्याधुनिक शस्त्रे नक्षलवाद्यांकडे कशी आणि नेमकी कोठून आली, याबाबत आताच तर्क बांधणे अवघड असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, नक्षलवाद्यांच्या ताब्यातून अशा प्रकारची शस्त्रे जप्त केली जाण्याची ही दुसरी वेळ आहे.

मागील वर्षी मे महिन्यामध्ये सुकमात झालेल्या चकमकीमध्येही अशा प्रकारची शस्त्रे आढळून आली होती. या ठिकाणी नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर केलेल्या हल्ल्यामध्ये 25 जवान हुतात्मा झाले होते. आता कांकेरमधील नक्षलवाद्यांच्या ताब्यातून "जी-3' या रायफलींसोबतच स्वयंचलित आणि पॉइंट 303 आणि पॉइंट 315 कॅलिबरच्या रायफलीही जप्त करण्यात आल्या आहेत. ही शस्त्रे परदेशातूनच येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

स्वयंचलित शस्त्रांसाठी प्रयत्न 

देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी या आधीही पाकिस्तान आणि चीनने नक्षलवाद्यांना शस्त्रपुरवठा केल्याचे लष्करी अधिकारी सांगतात. आताही पाकिस्तानने वरकरणी लष्करी अर्थसंकल्पास कात्री लावली असली, तरीसुद्धा रशियाकडून अतिरिक्त शस्त्रे मिळावीत म्हणून तेथील सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. स्वयंचलित अत्याधुनिक शस्त्रांच्या खरेदीसाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com