पणजी पोटनिवडणुकीत तीन वाजेपर्यंत 60 टक्के मतदान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले. या मतदानाला सकाळी सातपासून सुरवात झाली असून, सायंकाळी सहापर्यंत मतदान करण्याची वेळ आहे.

पणजी : पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले. या मतदानाला सकाळी सातपासून सुरवात झाली असून, सायंकाळी सहापर्यंत मतदान करण्याची वेळ आहे.

नुकत्याच झालेल्या उत्तर गोवा लोकसभा निवडणुकीवेळी पणजी मतदारसंघातून 71.58 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे पणजी पोटनिवडणुकीसाठी हे मतदान वाढण्याची संख्या आहे. सकाळी 7 ते 9 या दोन तासांत 14.36 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 11 वाजेपर्यंत हे प्रमाण 31.48 टक्क्यांवर पोहचले होते. त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत 47.58 टक्के मतदान झाले होते.

तसेच दुपारनंतर मतदारांची गर्दी कमी प्रमाणात दिसून आली. त्यामुळे दुपारी 1 ते 3 या वेळेत 12 टक्के मतदान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panaji bypoll election 60 percent voting till 3 o clock