बहिण-भावाचा जबरदस्तीने विवाह; व्हिडिओ व्हायरल...

वृत्तसंस्था
Wednesday, 18 March 2020

पंचायतीने बहिण-भावाचा जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

पाटणा (बिहार): पंचायतीने बहिण-भावाचा जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

हनिमूनच्या रात्री पत्नी लागली तडफडायला...

कटिहार जिल्ह्यातील कालीगंज गावामध्ये ही घटना घडली आहे. विवाह लावून देण्यात आलेले बहिण-भाऊ हे अल्पवयीन आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पंयायतीने बहिण-भावाचा जबरदस्तीने विवाह लावून दिला आहे. यामध्ये भाऊ हा बहिणीच्या भांगात कुंकू भरताना दिसत आहे. यावेळी महिलांसह नागरिक उपस्थित असल्याचे दिसतात, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

मुलांच्या वडिलांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'पंचायतीचे लोक माझ्या मुलाला व मुलीला जबरदस्तीने घेऊन गेले आणि दोघांचा जबरदस्तीने विवाह लावून दिला.'

साहेब, तिला दुसऱयासोबत लग्न करायचं होत म्हणून...

विवाहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. पोलिस अधिकारी हरिमोहन शुक्ला यांनी सांगितले की, 'व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर आम्हाला याबाबतची माहिती समजली. याबाबतची सत्यता पडताळल्यानंतर कारवाई केली जाईल. उपस्थितांना ताब्यात घेऊन दोषींवर कडक कारवाई करणार आहोत.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: panchayat amazing order to marriage of minor brother and sister at bihar