'5 वर्षाच्या मुलीचा, 8 वर्षाच्या मुलाशी विवाह लावा'; पंचायतीचा मुलीच्या पित्याला आदेश

वृत्तसंस्था
शनिवार, 15 एप्रिल 2017

मुलीच्या पित्याने केलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा एका आठ वर्षाच्या मुलासोबत विवाह लावून देण्याचा आदेश गुना जिल्ह्यातील तारापूर गावातील पंचायतीने दिला आहे.

गुना (मध्य प्रदेश) : मुलीच्या पित्याने केलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून त्याच्या पाच वर्षाच्या मुलीचा एका आठ वर्षाच्या मुलासोबत विवाह लावून देण्याचा आदेश गुना जिल्ह्यातील तारापूर गावातील पंचायतीने दिला आहे.

जगदीश बंजारा यांच्या शेतात तीन वर्षांपूर्वी एक वासरू चरत होते. त्याला हटवण्यासाठी जगदीश यांनी दगड मारला. दुर्दैवाने त्यात वासराचा मृत्यू झाला. या प्रकाराबद्दल शिक्षा म्हणून गावातील पंचायतीने जगदीश यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा आदेश दिला. आता पुन्हा या प्रकरणावर नव्याने चर्चा करत जगदीश यांना त्यांच्यावरील बहिष्कार हटवावा असे वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीचा एका आठ वर्षाच्या मुलासोबत विवाह लावून द्यावा, अशी शिक्षा फर्माविण्यात आली. हुंडा म्हणून एक लाख रुपये देण्यात यावेत, असाही आदेश पंचायतीने दिल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

माध्यमांमध्ये हे वृत्त आल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. 'आम्ही तारापूरमध्ये चौकशी पथक पाठविले आहे. दोषींविरूद्ध कडक कारवाई करण्यत येईल', अशी माहिती गुनाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी नयन खान यांनी दिली आहे.

Web Title: Panchayat orders marriage of 5-yr-old girl to 8-yr-old boy as punishment for girl’s parents