पणजीतील हिंसक आंदोलकांवर पोलिसांचा लाठी हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

पणजी - खाण बंदी उठवण्यासाठीची मागणी घेऊन पणजीत जमलेल्या खाण समर्थकांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी आंदोलनाची जागा बदलण्याचा आदेश देऊनही तिथून हटण्यास नकार देणाऱ्या आंदोलकांवर लाठी हल्ला करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. आसपासच्या वाहनांचीही मोडतोड केली. शांतता राखाण्यास नकार देणाऱ्यांवर मग पोलिसांनी लाठी हल्ला केला. मग आंदोलक सैरावैरा पळाले. दगडफेकीत सरकारी अधिकारी, पोलिस व पत्रकारही जखमी झाले आहेत. हिंसक आंदोलकांवर कारवाई करताना त्यांच्यासोबत असलेले भाजपचे कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल जखमी झाले आहेत.

Web Title: Panjim lathicharge on strikers in goa by police