भन्साळींवरील हल्ल्याचा पंकज निहलानींकडून निषेध

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई : "पद्मावती' चित्रपटात काही चुकीच्या गोष्टी दाखविण्यात येत असल्याचा आरोप करत राजपूत सेना करनीच्या कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक संजय लिला भन्साळींवर केलेल्या हल्ल्याचा केंद्रीय चित्रपट प्रमाणिकरण मंडळाचे अध्यक्ष पंकज निहलानी यांनी निषेध केला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना निहलानी म्हणाले, "राजस्थानसाठी अशा घटना नवीन नाहीत. चित्रपटाचे टीझर पाहून तेथील लोकांनी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. जर सरकार जागे झाले नाही आणि दोषींवर कडक कारवाई केली नाही तर भारतीय चित्रपट सृष्टीत निराशा पसरेल. लोकांनी संयम ठेवत टीझर पाहून गोंधळ करण्यापेक्षा संपूर्ण चित्रपट पाहून निर्णय घ्यावा.'

'आम्ही असहाय्य झालो असून आम्हाला संताप झाला आहे. हे आमचे भविष्य नाही',   अशा प्रतिक्रिया यांनी करण जोहर व्यक्त केल्या आहेत. तर ऋतिक रोशनने 'मिस्टर भन्साळी, सर. मी तुमच्या सोबत आहे' अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Web Title: Pankaj Nihalani condemns assault on Bhansali