esakal | पंकजा मुंडे, तावडेंची दिल्लीत बदली; कारण वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja-and-Vinod

केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित ‘टीम नड्डा’  आज अखेर जाहीर करण्यात आली. भाजपच्या राज्य नेतृत्वाशी पंगा घेणाऱ्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे या दोघांनाही राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. खासदार हीना गावित यांना राष्ट्रीय प्रवक्तेपदी बढती देण्यात आली असून व्ही. सतीश (सहसंघटनमंत्री), सुनील देवधर (सचिव) व जमाल सिद्दीकी (अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष) या मराठी चेहऱ्यांनाही नव्या कार्यकारिणीत जागा मिळाली आहे. पुढील महिन्यात नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक दिल्ली किंवा पाटण्यात होण्याची शक्‍यता आहे.

पंकजा मुंडे, तावडेंची दिल्लीत बदली; कारण वाचा

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाची बहुप्रतिक्षित ‘टीम नड्डा’  आज अखेर जाहीर करण्यात आली. भाजपच्या राज्य नेतृत्वाशी पंगा घेणाऱ्या पंकजा मुंडे व माजी मंत्री विनोद तावडे या दोघांनाही राष्ट्रीय सचिवपद देऊन त्यांची दिल्लीत बदली करण्यात आली आहे. खासदार हीना गावित यांना राष्ट्रीय प्रवक्तेपदी बढती देण्यात आली असून व्ही. सतीश (सहसंघटनमंत्री), सुनील देवधर (सचिव) व जमाल सिद्दीकी (अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्ष) या मराठी चेहऱ्यांनाही नव्या कार्यकारिणीत जागा मिळाली आहे. पुढील महिन्यात नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक दिल्ली किंवा पाटण्यात होण्याची शक्‍यता आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नड्डा यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर तब्बल ८ महिन्यांनी जाहीर झालेल्या व सुमारे ६८ जणांच्या या कार्यकारिणीत हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या म्हणजे फक्त ६ ते ७ मराठी चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. शाम जाजू यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून हटवून त्यांना पूर्णवेळ दिल्लीची जबाबदारी देण्याचे पक्षनेतृत्वाने ठरविल्याचे दिसते. विजया रहाटकर व पूनम महाजन यांच्याकडून अनुक्रमे महिला मोर्चा व युवा मोर्चाची अध्यक्षपदे काढून घेण्यात आली आहेत. महाजन या आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात  ‘टीम मोदी’ च्या सदस्या असतील असे समजते. 

रामलल्लानंतर आता श्रीकृष्ण जन्मभूमीचा वाद न्यायालयात; मशिद हटवण्याची मागणी

बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या सर्वेसर्वा नेतृत्वाने पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या टीमची रचना करताना नव्या चेहऱ्यांना जास्तीत जास्त स्थान दिल्याचे दिसून येते. वसुंधरा राजे (राजस्थान) व रमणसिंह (छत्तीसगड) या माजी मुख्यमंत्र्यांना उपाध्यक्षपद देऊन दिल्लीत बोलावून घेण्याचे प्रयत्न अजून जारी आहेत. 

संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणेची गरज; पंतप्रधान मोदींची आमसभेत स्पष्टोक्ती

सूर्या तळपले, मालवीय कायम
लोकसभेतील सर्वांत तरुण खासदार असलेले बंगळुरूचे तेजस्वी सूर्या यांच्याकडे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्षपद देण्यात आले आहे. थेट पंतप्रधानांपर्यंत तक्रारी जाऊनही अमित मालवीय यांच्याकडे आयटी विभागाचे प्रमुखपद कायम ठेवण्यात आले आहे. राजीवप्रताप रूडी , राज्यवर्धन राठोड या माजी केंद्रीय मंत्र्यांना राष्ट्रीय प्रवक्ते करण्यात आले आहे. कॉंग्रेसच्या मीडिया सेलमध्ये वर्षानुवर्षे काम केल्यावर भाजपमध्ये आलेले टॉम वडक्कन यांनाही प्रवक्तेपद देण्यात आले आहे. 

Corona Updates: कोविड चाचण्यांचा 7 कोटींचा टप्पा पार; भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर

अनिल बलुनींना बढती
पदाधिकाऱ्यांच्या यादीत सर्वाधिक म्हणजे तब्बल २३ प्रवक्ते आहेत. अनिल बलुनी यांना मुख्य राष्ट्रीय प्रवक्तेपदी बढती मिळाली आहे. त्यांच्याशिवाय संजय मयूख, डॉ. संबित पात्रा, सुधांशु त्रिवेदी और शाहनवाज हुसेन हे पाच राष्ट्रीय प्रवक्ते असतील. या यादीतच राजीव चंद्रशेखर, जफर इस्लाम, अपराजिता सरंगी, राजू बिश्‍त हे खासदार तसेच मुंबईच्या संजू वर्मा, के. के .शर्मा व नूपुर शर्मा यांनाही स्थान मिळाले आहे. व्ही सतीश नावाने प्रचलित असलेले सतीश वेलणकर हे सहसंघटनमंत्री आहेत.

विजयवर्गीय महामंत्री 
प. बंगालच्या निवडणुका लक्षात घेता कैलास विजयवर्गीय यांना महामंत्री करण्यात आले आहे. या पदावरून राम माधव, मुरलीधर राव, अनिल जैन व सरोज पांडे यांना हटवून दुष्यंत कुमार गौतम, डी. पुरंदेश्वरी, सी. टी. रवी व तरुण चुग हे नवे चेहरे आले आहेत. राधा मोहन सिंह, मुकुल रॉय, रेखा वर्मा, अन्नपूर्णा देवी, भारती भेन शियाल, डी. के. अरुणा, एम चूबाआव, अब्दुल्ला कुट्टी नवे राष्ट्रीय उपाध्यक्ष असतील. 

के. लक्ष्मण (ओबीसी आघाडी), जमाल सिद्दीकी (अल्पसंख्याक) लाल सिंह आर्य (एस.सी) समीर ओरांव (एस.टी) हे विविध आघाड्यांचे नवे राष्ट्रीय प्रमुख आहेत. 

कार्यकारिणीतील महाराष्ट्र -
व्ही. सतीश ( सहसंघटनमंत्री) 
जमाल सिद्दीकी (अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष) 
विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर व विजया रहाटकर (राष्ट्रीय मंत्री) 
हीना गावित (प्रवक्‍त्या)
१ अध्यक्ष (नड्डा) 
१२ राष्ट्रीय उपाध्यक्ष 
४ संघटनमंत्री 
८ महामंत्री 
१३ मंत्री 
७ विविध आघाड्यांचे अध्यक्ष 
२ खजिनदार 
२३ प्रवक्ते

Edited By - Prashant Patil