मुलांच्या शाळेतील हजेरीसाठी पालक नाखूष; चेन्नई, कोलकत्यात मात्र शाळेबाबत उत्सुकता

वृत्तसंस्था
Sunday, 20 September 2020

देशात लॉकडाउन सुरू झाले तेव्हापासून शाळा बंद आहेत. सहा महिन्यांनंतर आता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारी (ता.२१) सुरू करण्याचे सूतोवाच सरकारने केले आहे. कोरोनाचा प्रसार संक्रमण वाढतच असताना आई-वडील मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार होतील का, याचे सर्वेक्षण एस.पी. रोबोटिक्स वर्क्स या ऑनलाइन शैक्षणिक कंपनीने केले आहे. त्यानुसार कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे ७८ टक्के पालकांनी सांगितले.

नवी दिल्ल्ली - देशात लॉकडाउन सुरू झाले तेव्हापासून शाळा बंद आहेत. सहा महिन्यांनंतर आता नववी ते बारावीचे वर्ग सोमवारी (ता.२१) सुरू करण्याचे सूतोवाच सरकारने केले आहे. कोरोनाचा प्रसार संक्रमण वाढतच असताना आई-वडील मुलांना शाळेत पाठविण्यासाठी तयार होतील का, याचे सर्वेक्षण एस.पी. रोबोटिक्स वर्क्स या ऑनलाइन शैक्षणिक कंपनीने केले आहे. त्यानुसार कोरोनाचे पूर्णपणे उच्चाटन होईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे ७८ टक्के पालकांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष बुडाले तरी आणि पुन्हा त्याच इयत्तेत राहावे लागले तरी मुलांना शाळेत पाठविण्याची पालकांची तयारी नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘शाळा सुरु होणे आवश्‍यक’
अहमदाबाद येथील मानसोपचारतज्ज्ञ आणि समुपदेशक डॉ. ध्रुव ठक्कर म्हणाले की, मुले त्यांच्या शालेय मित्र-मैत्रिणींना भेटू शकत नाहीत या गोष्टीचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याने शाळा सुरू होणे हे त्यांच्यासाठी चांगले ठरू शकते. पालकांनाही मुलांच्या अभ्यासाची चिंता फारशी राहणार नाही आणि ते त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतील.

Image may contain: text that says "शालेय वर्गातील अभ्यासाला पालक व विद्यार्थ्यांची पसंती (टक्केवारी) १२० ९० ७० ७ ९३ ७८ ६६ ६२ पालक ७७ ६८ ६० विद्यार्थी ७८ ७१ ५६ ५६ ३० ६७ ५६ ६२ ५६ बंगळूर प्रत्यक्ष वर्गाला पसंती (टक्क्यांत) ६७ विद्यार्थी चेत्ई हैदराबाद कोलकता मिनीमेट्रे मुंबई एनसीआर बिगर मेट्रो (स्त्रोत एस.पी. रोबोटिक्स वर्क्स) ६४ पालक"

सर्वेक्षणातील निरीक्षणे...
1) बंगळूर, मुंबई, हैदराबाद येथील पालकांना मुलांची जास्त चिंता
2) चेन्नई, कोलकत्यातील पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी
3) पालकांच्या व्यवसाय, नोकरीचा त्यांच्या विचारांवर प्रभाव
4) नोकरदार पालकांना मुलांची अधिक काळजी वाटते.
5) मुलांना शाळेत पाठविण्यास केवळ १७ टक्के नोकरदार पालकांची इच्छा
6) स्वतःचा उद्योग असलेले ३० टक्के आणि स्वतंत्र काम करणारे ५६ टक्के पालक मुलांना शाळेत पाठविण्याच्या तयारीत

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑनलाइन वर्ग
ज्या पालकांची मुलांना शाळेत पाठविण्याची तयारी नाही, अशा पालकांची आणि मुलांची ऑनलाइन शिक्षणालाही पसंती नसल्याचे या पाहणीत दिसले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents unhappy with their childrens school attendance