आजारी मुलीच्या उपचारांसाठी पालकांची मोदींकडे धाव

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 मार्च 2017

मोदी यांनी अद्याप या पत्राला उत्तर दिलेले नाही. मात्र यापूर्वीही मोदी यांच्याकडे अशा प्रकारची मदतीसाठी पत्रे आलेली आहेत. गरजूंना मोदींनी मदतही केली आहे. अस्थमाच्या आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या पित्याला मदत करावी यासाठी कानपूर येथील दोन मुलांनी मोदींना पत्र पाठविले होते. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या पत्राची तातडीने दखल घेत, जिल्हा रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली होती.

आग्रा (उत्तर प्रदेश) - आजारी मुलीवर उपचार करण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांनी वैद्यकीय मदतीसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धाव घेतली आहे.

येथील एका पाच वर्षांच्या मुलीला रक्ताच्या कमतरतेमुळे थॅलेसीमीया नावाचा आजार झाला आहे. मात्र तिच्यावर उपचार करण्यासाठी तिचे पालक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदतीसाठी याचना केली आहे. याबाबत बोलताना आजारी मुलीचे पालक म्हणाले, "आम्हाला विश्‍वास आहे की आमच्या मुलीला नरेंद्र मोदी मदत करतील.'

मोदी यांनी अद्याप या पत्राला उत्तर दिलेले नाही. मात्र यापूर्वीही मोदी यांच्याकडे अशा प्रकारची मदतीसाठी पत्रे आलेली आहेत. गरजूंना मोदींनी मदतही केली आहे. अस्थमाच्या आजाराने त्रस्त असलेल्या आपल्या पित्याला मदत करावी यासाठी कानपूर येथील दोन मुलांनी मोदींना पत्र पाठविले होते. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या पत्राची तातडीने दखल घेत, जिल्हा रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली होती.

Web Title: Parents write to PM Modi seeking help for daughters treatment