ट्विट डिलीट करण्यासाठी धमकी: परेश रावल

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मे 2017

मी अद्यापही माझ्या ट्विटवर ठाम आहे. मी माझे ट्विट डिलीट केलेले नाही. ट्विटरने ते डिलीट केले आहे. मला माहिती आहे, की मी केलेल्या ट्विटबाबत तक्रार केली असणार.

मुंबई - लेखिका अरुंधती राय यांच्याविरोधात करण्यात आलेले वादग्रस्त ट्विट डिलीट करण्यासाठी धमकी देण्यात आल्याचे, अभिनेता आणि भाजपा खासदार परेश रावल यांनी म्हटले आहे. हे फक्त एक ट्विटर अकाउंट असून, माझा इंडियन पासपोर्ट नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

परेश रावल यांचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. ते आपले अकाउंट पाहू शकतात, मात्र ते काही ट्विट करु शकत नाहीत. अरुंधती राय यांच्यासंबंधी ट्विट डिलीट केले नाही, तर त्यांचे अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल अशी सूचना त्यांना ट्विटरकडून देण्यात आली होती. ट्विट डिलीट करण्यासाठी आपल्याला धमकावले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

परेश रावल यांचे ते वादग्रस्त ट्विट सध्या त्याच्या अकाउंटवर दिसत नाही. यावर बोलताना ते म्हणाले, मी अद्यापही माझ्या ट्विटवर ठाम आहे. मी माझे ट्विट डिलीट केलेले नाही. ट्विटरने ते डिलीट केले आहे. मला माहिती आहे, की मी केलेल्या ट्विटबाबत तक्रार केली असणार. जेएनयूमधील विद्यार्थी शेहला रशीद, काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनीही वादग्रस्त ट्विट केली होती. रशीद हिने जीपवर दगडफेक करणाऱ्याच्या जागी गौतम गंभीरला बांधावे असे म्हटले होते. तर, दिग्विजय सिंह यांनी भाजप व पीडीपी या पक्षांची युती ज्यांनी केली त्यांना असे बांधले का जाऊ नये?'' असा प्रश्‍न केला होता. मात्र, त्यांची ट्विट डिलीट करण्यात आलेली नाहीत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या ः
पाकिस्तानचा दावा संयुक्त राष्ट्रानेही फेटाळला​
शिरुर: विनयभंग प्रकरणी महाराजाला मंदिरातून अटक​
तेजस एक्स्प्रेसमधून हेडफोन चोरीला, एलईडी स्क्रीनवर स्क्रॅच
पुणे अन् कोल्हापुरमधील अपघातग्रस्त बसचा क्रमांक एकच​
सहारनपूरमध्ये मोबाईल इंटरनेटवर बंदी​
काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली
शेतकऱ्यांना फसवणाऱ्या टोळक्यात मीही सामील झालो: राजू शेट्टी

मराठा क्रांती मोर्चा 9 ऑगस्टला मुंबईत धडकणार
समुद्रकिनाऱ्यांवर उद्यापासून बोटिंग बंद
मुंबई : हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत

Web Title: paresh rawal says there have been more offensive tweets by jnu student leader shehla rashid and congress leader digvijaya singh