
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत.
नवी दिल्ली- प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. आपली शायरी आणि वक्तव्यासाठी चर्चेत असणारे राणा यांनी एक ट्विट केलंय, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'संसदेला पाडून तेथे शेती करा'. दरम्यान, वाद निर्माण होत असल्याचं पाहून त्यांनी हे ट्विट डिलीट केलं आहे. पण, तोपर्यंत लोकांनी त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले होते.
'तरुणांनी धरावी नथुरामची वाट'; हिंदू महासभेने सुरु केलं 'गोडसे...
''संसदेला पाडून तेथे शेती करायला लागा, म्हणजे काही लोकांना भाकर तरी मिळेल. अशाच प्रकारे शेतकऱ्यांचे नशीब बदलेल, धनिकांचे गोदामे जाळून टाका, मी खोट्याच्या दरबारात खरं बोलत आहे, माझा गळा कापा किंवा मला जिवंत जाळा'', असं ट्विट मुनव्वर राणा यांनी केलं होतं. पण, वादा निर्माण होत असल्याचं पाहून त्यांनी आपलं ट्विट डिलीट केलं आहे. 'नवभारत टाईम्स'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मुनव्वर राणा यांनी एका खासगी टीव्ही चॅनेलवर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, संसदेची जूनी इमारत पाडण्याचं मी म्हणत होतो. राणा म्हणाले की, नवी संसद इमारत बनत आहे, त्यामुळे जून्या इमारतीला पाडायला पाहिजे. त्याठिकाणी शेती केली जाईल, जेणेकरुन लोकांना पोटभर जेवण मिळेल. यामध्ये काही चुकीची गोष्ट नाही. देशात तर आणीबाणी लागू झाली आहे, कारण शायरने तोंड उघडल्यानंतर त्याला शिव्या बसत आहेत.
PM मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक; लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर...
दरम्यान, ही पहिली वेळ नाही, जेव्हा मुनव्वर राणा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याआधीही त्यांनी फ्रान्सवर झालेल्या हल्ल्यासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यांनी फ्रान्समध्ये मोहम्मद पेंगबराचे कार्टून काढल्याबद्दल होणाऱ्या हत्त्यांचे समर्थन केले होते. जर कोणी आमच्या आईची किंवा वडिलांचे असे कार्टुन काढणार असेल, तर आम्ही त्यांना मारणारच. वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं होतं.