esakal | Live: शेतकऱ्यांची मुलं मंत्री झाल्याने काहींना दु:ख- मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

Live:  शेतकऱ्यांची मुलं मंत्री झाल्याने काहींना दु:ख- मोदी

Live: शेतकऱ्यांची मुलं मंत्री झाल्याने काहींना दु:ख- मोदी

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

Parliament monsoon session 2021 नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्याआधीच विरोधक आक्रमक झाल्याने पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. या अधिवेशनात एकूण २३ विधेयके सरकारकडून प्रस्तावित आहेत. त्यापैकी ६ जुनी तर १७ नवी विधेयके आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की सर्व नेत्यांचे आणि विरोधी पक्षांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. विरोधकांनी आपल मुद्दे मांडावेत आणि सरकारचे म्हणणं ऐकून घ्यावं.

पंतप्रधान मोदी राज्यसभेत बोलताना म्हणाले की, शेतकऱ्यांची मुलं आज मंत्री झालेले पाहून काहींना दु:ख झाल्याचं दिसत आहे. मंत्रिमंडळात महिलांना स्थान दिल्याने लोकांना दु:ख झालंय त्यामुळे ते त्यांचा परिचय करु देत नाहीयेत.

राज्यसभेचे कामकास सुरु झाल्यानंतर विरोधकांनी गोंधळ घातला. पंतप्रधान मोदी हे नव्या मंत्र्यांचा परिचय राज्यसभेला करुन देत होते. पण, विरोधकांनी गोंधळ घातला. विरोधकांनी जोरजार घोषणाबाजी सुरु केली.

पंतप्रधान मोदी यांनी नव्या मंत्र्यांची ओळख करुन देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आक्षेप घेतला. गोंधळामुळे लोकसभा 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

  • मंत्रिमंडळात महिला, दलित, ओबीसी, आदीवासी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संसेदत उत्साह आहे. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्र्यांची ओळख करुन दिली.

  • कोरोना काळात खासदार, राजकीय नेते, कलाकारांनी आपला जीव गमावला. प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार आणि धावपटू मिल्खा सिंग यांचेही कोरोना काळात निधन झाले. त्यांना राज्यसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्यसभेचे कामकाज 12:24 पर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

  • संसदेबाहेरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्वांनी करोना नियमांचं पालन करावं, असं आवाहन नेत्यांना केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना लस घेण्याचं आव्हान केलं. ते म्हणाले की, 'लस दंडावर घेतली जाते. त्यामुळेच कोरोना विरोधातील लढ्यात लस घेतलेला बाहुबली बनतो. 40 कोटींपेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत लस घेतली आहे. कोरोनाच्या लढ्यात सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. कोरोनाविरोधात बाहुबली होऊन लढा देऊयात.'

loading image