मोदी, ही धमकी नाही, शाप आहे: जयदेव गल्ला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जुलै 2018

नवी दिल्लीः आंध्र प्रदेशमधून भाजप नामशेष होईल. पंतप्रधान मोदी, ही धमकी नाही, शाप आहे. सत्ताधारी मोदी सरकारने आंध्रप्रदेशला दिलेले आश्वासन पाळले नाही. पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला जात नसेल तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्न तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी आज (लोकसभेत) विचारला.

नवी दिल्लीः आंध्र प्रदेशमधून भाजप नामशेष होईल. पंतप्रधान मोदी, ही धमकी नाही, शाप आहे. सत्ताधारी मोदी सरकारने आंध्रप्रदेशला दिलेले आश्वासन पाळले नाही. पंतप्रधानांनी दिलेला शब्द पाळला जात नसेल तर जनतेने विश्वास कोणावर ठेवायचा? असा प्रश्न तेलगू देसमचे खासदार जयदेव गल्ला यांनी आज (लोकसभेत) विचारला.

जनतेचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात लोकसभेत मांडलेल्या अविश्वास ठरावाविरोधात आज (शुक्रवार) मतदान होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. सकाळी अकरा वाजता चर्चेला सुरुवात झाली. अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलगू देसम आक्रमक झाला आहे. भाजपविरोधात तेलुगू देसमने अविश्वास प्रस्ताव आणला आहे. याला काँग्रेससह बहुतोक सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. लोकसभेत भाजपचे बहुमत अगदी काठावरच आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आंध्र प्रदेशमधून भाजप नामशेष होईल. पंतप्रधान मोदी, ही धमकी नाही, शाप आहे, असे खासदार जयदेव गल्ला म्हणाले.

सत्तेच्या चार वर्षांत पहिल्यांदाच मोदी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला असून आज यावर चर्चा होणार आहे. विरोधी गटातील काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलुगु देसम, सप या प्रमुख पक्षांची एकी कायम राहील. ‘आप’नेही मोदी सरकारविरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधारी भाजपकडे पुरेसे संख्याबळ असल्याने केंद्र सरकारला धोका नसला, तरी कुंपणावर असलेले प्रादेशिक पक्ष नेमके कोणत्या बाजूला झुकतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी कुंपणावरील पक्ष नेमके कोणाच्या बाजूने जातात, यालाही महत्त्व आले आहे.

लोकसभेत एकूण 544 जागा असून विद्यमान सदस्यसंख्या 534 इतकी आहे. बहुमतासाठी 268 ची आवश्यकता आहे. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 314 खासदारांचे बळ आहे. यात भाजपाचे 273  आणि मित्रपक्षाचे 41 खासदार आहेत. विरोधकांकडे काँग्रेस (48), तृणमूल काँग्रेस (34), तेलगू देसम (16) व अन्य पक्ष (49) असे मिळून 147 खासदारांचे बळ आहे.

 
Web Title: Parliament Monsoon Session Jayadev galla statement