संसदीय समितीला 'राजन' यांच्या सल्ल्याची आवश्यकता

वृत्तसंस्था
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

संसदीय मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना समितीच्या पुढील बैठकीला हजर राहण्यास सांगितले आहे. संसदीय समिती देशात उद्भवलेल्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) च्या संकटाला तोंड देण्यासाठी चौकशी करत आहे. त्यासाठी समितीला राजन यांच्या सल्ल्याची आवश्यकता वाटत आहे. त्यामुळे, रघुराम राजन लवकरच या समितीपुढे हजर राहण्याची शक्यता आहे. तसेच या एनपीएच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मदत करावी, अशी आशाही संसदीय मूल्यांकन समितीने रघुराम राजन यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली- संसदीय मूल्यांकन समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना समितीच्या पुढील बैठकीला हजर राहण्यास सांगितले आहे. संसदीय समिती देशात उद्भवलेल्या एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) च्या संकटाला तोंड देण्यासाठी चौकशी करत आहे. त्यासाठी समितीला राजन यांच्या सल्ल्याची आवश्यकता वाटत आहे. त्यामुळे, रघुराम राजन लवकरच या समितीपुढे हजर राहण्याची शक्यता आहे. तसेच या एनपीएच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मदत करावी, अशी आशाही संसदीय मूल्यांकन समितीने रघुराम राजन यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

माजी मुख्य सल्लागार (सीए) अरविंद सुब्रमण्यण यांनी मुरली मनोहर जोशी आणि संसदीय समिती यांच्यासमोर रघुराम राजन यांची स्तुती केली होती. त्याच अनुषंगाने मुरली मनोहर जोशी आणि समितीला राजन यांच्याकडून मोठ्या आशा आहेत, त्यामुळे त्यांनी राजन यांना पत्र लिहले असल्याचे बोलले जात आहे. सुब्रमण्यण यांनी गेल्या महिन्यातच वाढत्या कर्जामुळे अडचणी वाढत असल्याचे स्पष्टीकरण समीतीला दिले होते.

दरम्यान, रघुराम राजन 2016मध्ये रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरुन पायउतार झाले होते. त्यानंतर रघुराम राजन यांनी अमेरिकेतल्या विद्यापीठात संशोधक म्हणून नोकरी स्वीकारली. राजन यांच्या क्षमतेवर विश्वास असल्याने एनपीएशी दोन हात करण्यास रघुराम राजन निर्णायक ठरतील, अशी संसदीय समितीला आशा आहे. राजन संसदीय समितीसमोर हजर होऊ शकत नसल्यास त्यांनी त्यांचं उत्तर लिखित स्वरूपात समितीला पाठवावे, असे मुरली मनोहर जोशींनी पत्रात म्हटले आहे. केंद्रानं ही समस्या सोडवण्यासाठी कोणत्या दिशेनं कार्य केलं पाहिजे, याचंही मार्गदर्शन राजन यांनी करावं असेही राजन यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Parliament panel wants Raghuram Rajans advice on solving NPA crisis