पर्रीकर यांची योग्यताच नाही...- कॉंग्रेस

वृत्तसंस्था
रविवार, 6 नोव्हेंबर 2016

"पर्रीकर यांना वाढविण्यात आलेला पगार आणि ओआरओपी यांमधील फरकच माहिती नाही. ओआरओपीचा मुद्दा अद्याप संपुष्टात आलेला नाही. आणि यामुळेच दुदैवाने राम किशन ग्रेवाल यांचा मृत्यु ओढविला. याचे समर्थन पर्रीकर करु शकतात काय? पर्रीकर यांची संरक्षण मंत्री म्हणून काम करण्याची योग्यता नाही

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची मनोहर पर्रीकर यांची योग्यता नसल्याची कठोर टीका कॉंग्रेस पक्षाकडून आज (रविवार) करण्यात आली. ओआरओपी योजनेचा लाभ भारतीय लष्करामधील सुमारे 95% माजी सैनिकांना मिळाल्याचे विधान पर्रीकर यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडून हा नवा हल्ला चढविण्यात आला आहे.

"पर्रीकर यांना वाढविण्यात आलेला पगार आणि ओआरओपी यांमधील फरकच माहिती नाही. ओआरओपीचा मुद्दा अद्याप संपुष्टात आलेला नाही. आणि यामुळेच दुदैवाने राम किशन ग्रेवाल यांचा मृत्यु ओढविला. दिल्लीमध्ये गेल्या 500 दिवसांपासून ओआरओपीच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. याचे समर्थन पर्रीकर करु शकतात काय? पर्रीकर यांची संरक्षण मंत्री म्हणून काम करण्याची योग्यता नाही,'' अशी टीका कॉंग्रेसचे नेते ओम प्रकाश मिश्रा यांनी केली.

देशातील केवळ 1 लाख माजी सैनिकांना तांत्रिक समस्येमुळे ओआरओपी योजनेनुसार निवृत्तीवेतन मिळत नसून येत्या दोन-तीन महिन्यांत ही समस्या दूर होईल, असे विधान पर्रीकर यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडून पर्रीकर यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

Web Title: Parrikar does not deserve to be a minister, says Congress