समाजवादी पक्षामधील सर्व पदांचे विसर्जन

पक्षप्रमुख अखिलेश यादव यांचा दूरगामी निर्णय
akhilesh yadav
akhilesh yadav

लखनौ - समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभा पोटनिवडणूकीतील दारुण पराभवानंतर पक्षातील सर्व पदांचे विसर्जन केले आहे. उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपदच केवळ कायम ठेवण्यात आले.

उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्षपद नरेश उत्तम हे आपले काम सुरु ठेवतील. त्यांच्याशिवाय राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा कार्यकारीणी, युवक आणि महिला विभागाचे पदाधिकारी अशी सर्वच पदे विसर्जित करण्यात आली.

हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे. यासंदर्भात कोणतेही कारण अधिकृतरित्या देण्यात आले नाही. पक्षप्रमुख अखिलेश यांनी हा निर्णय घेतल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. केवळ सपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा निर्णय जाहीर करण्यात आला. सपचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या रामपूर आणि आझमगढ या लोकसभेच्या जागा पक्षान गमावल्या. त्यानंतर पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे असे मानले जात आहे.

विधानसभा निवडणूकीत सपने अनपेक्षित यश मिळविले होते. त्यात सपने ११ जागा जिंकल्या. मित्रपक्षांसह सपने एकूण १२५ जागांपर्यंत मजल मारली. विधानसभेसाठी अखिलेश यांनी आझमगढची खासदारकी सोडली होती. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपने ही जागा जिंकली. सपच्या धर्मेंद्र यादव यांचा भाजपच्या दिनेशलाल यादव यांच्याकडून पराभव झाला. रामपूरमध्ये भाजपच्या घनश्यामसिंह लोधी यांनी सपच्या महंमद असिम राजा यांना पराभूत केले.

२०२४ साठीच निर्णय

सपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, आझमगढ आणि रामपूर या दोन जागा गमावल्यानंतर आता २०२४च्या लोकसभा निवडणूकीसाठी सज्ज होण्याकरीत पक्षसंघटना भक्कम करून भाजपच्या आव्हानाला पूर्ण ताकदिनीशी सामोरे जाण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com