पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स महागणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

सेवाशुल्कात वाढ करण्याचे केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली - केंद्र सरकारने महसूलवाढीसाठी पासपोर्ट तसेच वाहन परवाना, नोंदणी तसेच सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अन्य सुविधांच्या सेवाशुल्कात लवकरात लवकर वाढ करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. सरकारवरील आर्थिक भार कमी करण्याच्या दृष्टीने या सूचना देण्यात आल्या आहेत.

केंद्र सरकार पासपोर्ट व वाहन परवाना आदी सुविधांसाठी सवलत देते. त्यामुळे सरकारच्या खर्चामध्ये भर पडत आहे. त्यामुळे लाभधारकांकडूनच या सेवांवर होणारा खर्च वसूल करण्यात यावा. जेणेकरून सरकारी अनुदानावर होणारा खर्च विकासकामांवर करता येऊ शकेल, स्वायत्त संस्थांनी आत्मनिर्भर व्हावे, असा या सूचनांमागील विचार आहे. याआधी पासपोर्ट विभागाने सप्टेंबर 2012 मध्ये सेवा शुल्क एक हजार रुपयांवरून दीड हजार केले होते. तेव्हापासून या शुल्कात वाढ झालेली नाही.

यूपीएससीचे शुल्कही वाढणार
लोकसेवा आयोग (यूपीएससी) सध्या एका परीक्षेसाठी विद्यार्थ्याकडून 100 रुपये शुल्क घेते; मात्र काही वर्षांपासून परीक्षार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यामानाने परीक्षा शुल्कात मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे केंद्रीय अर्थ खात्याने "यूपीएससी'लाही या शुल्कात वाढ करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Passport, Vehicle permit, UPSC fees will increase